टिकटॉक पुन्हा सुरू होणार ?माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चीनच्या विश्‍वासघातकी धोरणामुळे आणि सुरक्षेच्या कारणावरुन भारतात टिकटॉकसह अनेक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र भारतासारखी मोठी बाजारपेठ गमावणं टिकटॉकला TikTok परवडणारं नाही. त्यामुळे भारताच्या धडक कारवाईमुळे धास्तावलेल्या टिकटॉकने चीनसोबतचे आपले संबंध कायमचे तोडण्याच्या दिशेने पावले उचलली असून, आपले मुख्यालय देखील चीनमधून लंडनमध्ये Headquarters china to London हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यालय दुसर्‍या देशात हलवून घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी टिकटॉक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. चीनने भारतासोबत जे केले, त्याची सर्वांत मोठी किमंत आम्हालाच चुकवावी लागली आहे. भारत ही आमच्यासाठी जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ होती, पण चीनमुळे ती गमावण्याची वेळ आहे. यापुढे आम्हाला चीनसोबत कुठलेच संबंध ठेवायचे नसल्याने, आम्ही लंडनमध्ये मुख्यालय नेण्याचे ठरविले आहे असे टिकटॉकचे म्हणणे आहे. या मुद्यावर ब्रिटन सरकारशी चर्चा सुरू आहे. आणखीही काही देशांबाबत आम्ही विचार केला, पण लंडन आम्हाला सुरक्षित वाटले.

अमेरिकेतही टिकटॉकला प्रचंड विरोध असून, या विरोधात कडक निर्बंधासह कठोर कारवाई करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्धार आहे. टिकटॉकच्या माध्यमातून चीन हेरगिरी करीत असल्याचा अमेरिका आणि भारताचा स्पष्ट आरोप आहे. अशा स्थितीतही आम्ही अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मुख्यालय हलविण्याच्या प्रस्तावावर विचार केला. मात्र, वाढता विरोध लक्षात घेऊन आम्ही आता लंडन येथे मुख्यालय नेण्याचा विचार करीत आहोत. ब्रिटन सरकारला आमचा प्रस्ताव मान्य झाल्यास, लगेच पुढची पावले उचलण्यात येतील, असेही टिकटॉकने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, करोना विषाणूच्या प्रसाराच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्यामुळे टिकटॉकची देखील अमेरिकन प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. चीनी सरकारने युजर्सची माहिती देण्यासंदर्भात टिकटॉकवर दबाव टाकला असू शकतो, अशी शंका अमेरिकेला असल्यामुळे अमेरिकन प्रशासन अधिक सतर्क राहून चौकशी करत आहे. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियाऐवजी लंडनमध्येच टिकटॉकचं मुख्यालय होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यालय हलवल्यानंतर देखील भारतासोबतच ज्या ज्या देशांनी टिकटॉकवर बंदी घातली आहे, त्या देशाकडून काय निर्णय घेतला जातो, यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. शिवाय, टिकटॉक सुरू झाल्यानंतर देखील जुने युजर्स आणि त्यांच्या अकाऊंटवर असणारे लाखो फॉलोअर्स तसेच राहतील की पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागेल, हे देखील अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post