राम मंदिर - दिग्विजय सिंह यांनी केली 'ही' मागणी



माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी तयार केलेल्या विश्वस्त मंडळाच्या सदस्या विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच शंकराचार्य यांना ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली.

दिग्विजय म्हणाले,"भव्य राम मंदिर बांधावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. परंतु केंद्र सरकारने शंकराचार्यांना विश्वस्त मंडळामध्ये स्थान दिले नाही, त्यांच्या जागी विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विश्वस्त मंडळाचे सदस्य झाले आहे. यावर आमचा आक्षेप आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी 5 ऑगस्टला मंदिराचे पायाभरणी केली तर भूमिपूजनाच्या कार्यक्रमास शंकराचार्य आणि रामानंदी पंथातील स्वामी रामनरेशचार्य यांनाही आमंत्रित केले जावे आणि त्यांना विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून घोषित करावे." अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post