जान्हवीचा 'हा' चित्रपट पाहायला तयार राहा


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - जान्हवी कपूरचा चित्रपट 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेटदेखील समोर आली आहे. एक रिपोर्टनुसार, हा वॉर ड्रामा चित्रपट पुढील महिन्यात १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल'साठी युद्धात जाणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला वैमानिक गुंजन सक्सेनाची कहाणी आहे.

लवकरच रिलीज होणार चित्रपटाचा ट्रेलर

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यास सज्ज झाला आहे. या ट्रेलरच्या रिलीजसाठी अनेक तारखांवर विचार केला होता. आता चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपट गुंजन सक्सेना बायोपिक असून या जान्हवी चित्रपटामध्ये एअरफोर्स पायलटची भूमिका करताना दिसणार आहे.

नेटफ्लिक्सने शेअर केला होता व्हिडिओ

काही दिवसआधी नेटफ्लिक्सने चित्रपटाच्या घोषणेशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर आपल्या आवाजाने गुंजन सक्सेनाचा बालपणापासून पायलट बनण्यापर्यंतचा प्रवास ऐकवते. या व्हिडिओमध्ये गुंजन सक्सेनाचा ओरिजनल फोटोज दाखवण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी स्वत: जान्हवी कपूर गुंजन सक्सेनाच्या भूमिकेत दिसत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post