..त्यामुळे सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत uday samant यांनी पत्रकार परिषद घेत यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. राज्यातील १३ कुलगुरू सोबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला होता. तसेच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करूनच निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

ते बोलतांना म्हणाले, "अनेक लोकांनी मी यूजीसीला पत्र का लिहिलं असा प्रश्न विचारत आकांडतांडव केलं. मी १७ मे रोजीच यूजीसीला अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. मी अनेक तज्ज्ञांशीही बोललो. त्यांनी परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवलं. यानंतर आपतकालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देखील यूजीसीला (UGC) पत्र देण्यात आले."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post