बागल पंडुगू सण घरातच साजरा करावामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पद्मशाली समाजामध्ये गेले कित्येक वर्षापासून बागल पंडुगू हा सण म्हणजेच बागेचा सण मोठ्या थाटाम ाटात साजरा केला जातो. सध्याची कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता हा सण पद्मशाली समाजाने घरामध्ये राहूनच घरातील देव देवतांना नैवद्य ठेवून साजरा करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व फटका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले. या दिवशी समाजातील प्रत्येक घटक मग तो गरीब असो किंवा श्रीमंत उच्च शिक्षित असो किंवा अशिक्षित हा सण साजरा करतोच.

वास्तविक पाहता या दिवशी समाजतील प्रत्येक घरामध्ये गोड पुरी, मेथीची भाजी असे नैवद्य पोषम्मा देवीला दाखवत व प्रत्येक जनसमुदायकडून मिरवणूक काढून पोतराज यांना बरोबर घेऊन बालिकाश्रम रोड वरील मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करणे असे होत व या ठिकाणी मोठी जत्रा भरवली जाते. हे सर्व करणे मागचा उद्देश असा आहे की समाजातील लोक या दिवशी देवीला साकडे घालून या निसर्गाचे संरक्षण कर, तसेच पर्जन्य वृष्टी संतुलित होऊ दे व कुठे ही दुष्काळ अगर अतिवृष्टीने नुकसान होऊ नये अशी प्रार्थना केली जाते.

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये अहमदनगर शहरांत बागल पंडुगू सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो हे बहुतांशी लोकांना माहिती आहे व या सणासाठी बाहेगावहून खास नगर येथे पाहुणे मंडळी येऊन हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग अशांत झाले असून त्याचा परिणाम अहमदनगर शहारामध्ये ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये पद्मशाली समाजाने हा सण घरामध्ये राहूनच घरातील देवदेवतांना नैवद्य ठेवून साजरा करावा. प्रत्येकाने प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

या सणाचे दिवशी तोफखाना व बालिकाश्रम रोड या दोन्ही मंदिरामध्ये यात्रा भरणार नाही हे या पूर्वीच सदर मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. याबाबत संपूर्ण समाजाने काळजी घ्यावी तसेच बागल पंडुगू सणाचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने घरटी एक रोप लावून त्याची निगा राखण्याचे वचन घ्यावे जेणे करून आपण ही या निसर्गाच्या संवर्धनात आपली मदत होईल, असे आवाहन श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post