व्हॉटसऍप-फेसबुक मेसेंजरचे होणार विलिनीकरण


माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुक लवकरच आपल्या सर्व मेसेजिंग सेवांचे विलिनीकरण करणार आहे. याला क्रॉस प्लॅटफार्म मेसेंजिग म्हणता येईल. थोडक्यात या प्लॅटफर्मवरून एकमेंकाना मेसेज पाठवता येईल. सध्या फेसबुक यावर काम करत असून, याच्या लॉंचिंगनंतर व्हॉटसअॅप युजर थेट फेसबुक मेसेंजरवर मेसेज करू शकतात.

फसबुक सीईओ मार्क झुकरबर्गने मागील वर्षी स्पष्ट केले होते की, कंपनी क्रॉस प्लॅटफर्म सेवा देऊ शकते. व्हॉटसऍप, मेसेंजर आणि इंस्टाग्राम हे फेसबुकच्याच मालकीचे असल्याने हे शक्य आहे WABetainfo च्या रिपोर्टनुसार, ही सेवा कशी असेल सध्यातरी सांगता येणार नाही, मात्र हे क्रॉस चॅट फिचरप्रमाणे असेल.

रिपोर्टनुसार, क्रॉस चॅटसारखा कोड फेसबुक मेसेंजरमध्ये आढळला असून, यावरून अंदाज लावला जात आहे की, व्हॉटसऍपचे मेसेज थेट मेसेंजरवर रिसिव्ह करता येतील. मेसेंजरद्वारे व्हॉटसऍप चॅट वाचता येईल, असेही सांगितले जात आहे. हे फिचर पर्याय असेल व तुम्हाला क्रॉस चॅटिंग हवे असल्यास तुम्ही निवड करू शकता. यासाठी कंपनी एक बटन देखील देईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post