हृषिकेश जोशीनं सांगितले ज्युनिअर बच्चनशी दोस्तीचे किस्से


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या 'ब्रीद' या वेब सीरिजचा पहिला सीझन गाजल्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन येतोय. या सीझनमध्ये अभिषेक बच्चनबरोबर अभिनेता-लेखक हृषिकेश जोशी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सीझनमधल्या हृषिकेशच्या अभिनयाचं खुद्द माधवन तसंच प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक तसंच जगभरातल्या प्रेक्षकांकडूनही हृषीकेशला पसंतीची पावती मिळाली. दुसऱ्या सीझनमध्ये हृषिकेशच्या भूमिकेमध्ये काही अधिक चांगले बदल करून ती महत्त्वाची केली गेली आहे. दुसऱ्या सीझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश काय करतोय याची उत्सुकता असेल. या शूटिंगदरम्यान ज्युनिअर बच्चनशी हृषीकेशची चांगली दोस्ती झाली.

वेब सीरिजचा दुसरा सीझन पहिल्या सीझनप्रमाणेच मयांक शर्मा यांनीच दिग्दर्शित केला आहे. 'मला जेव्हा पहिल्या सीझनसाठी बोलावलं गेलं, तेव्हा माझ्यासाठी वेब सीरिज हे माध्यम नवीन होतं. त्याची मला फारशी माहितीही नव्हती. पण, हेच आता भविष्य असणार आहे, हे मला नक्की ठाऊक होतं. त्यामुळे हे करायचं असं मी ठरवलं. माझी ऑडीशन निर्माते-दिग्दर्शक यांना खूपच आवडली आणि या वेब सीरिजसाठी माझ्याकडून लगेच होकार घेण्यात आला', हृषीकेश सांगतो. तो पुढे म्हणाला की, 'पहिल्या सीझनला आणि त्यातल्या माझ्या व्यक्तिरेखेला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितलं की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सीझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्त्वाची होत जाणार आहे. त्यानुसार दुसऱ्या सीझनमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली.'

अभिषेक बच्चनबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना हृषीकेश म्हणाला, की 'या सीझनच्या चित्रिकरणादरम्यान माझी आणि अभिषेकची खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकत्रच जेवायचो, सेटवर खूप क्रिकेट खेळायचो. खूप गप्पा मारायचो. अभिषेक खूप गप्पिष्ट आहे. त्याला गोड खायला आवडतं आणि मलाही. त्यांनी एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनवलेला गाजराचा हलवा आणला होता.'
पुन्हा एकदा गॅरीची शनाया; रसिका सुनील म्हणते...
अलीकडे आम्ही सीझन दोनच्या भागाचं डबिंग करत होतो. त्यावेळी अभिषेक मला म्हणाला, की या सीझनमध्ये कोणती व्यक्तिरेखा सर्वाधिक लक्ष वेधणारी असेल, तर ती तुझी आहे. तुझं कॅरेक्टर हे या सीझनमधील सरप्राइज पॅकेज असणार आहे. माझ्यासाठी ही सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट होती. मराठी कलाकारांबद्दल आणि मराठी रंगभूमीबद्दल त्याला प्रचंड आदर आहे.
-हृषीकेश जोशी

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post