'टिकटॉक'प्रमाणेच 'चिंगारी'वर मिळेल कमाईची संधी



माय अहमदनगर वेब टीम
चीनी अॅप टिकटॉक बॅन झाल्यानंतर भारतीय अॅप चिंगारी भारतीय नागरिकांच्या स्मार्टफोनमध्ये जागा बनवत आहे. यासोबतच अॅप आपल्या फीचर्सला अपडेटही करत आहे. टिकटॉकप्रमाणेच शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म चिंगारी अॅपवर आता क्रिएटर्स आपल्या टँलेंटला शोकेज करुन चांगली कमाई करू शकतात.

अॅप डेव्हलपर्सनी म्हटले की, ते म्यूजिक क्रिएटर्सला गाण्याची रिच आणि हिट्सच्या आधारे पेमेंट करतील. इतकच नाही, तर चिंगारी म्यूजिक कंपोजर्सच्या हिट गाण्यांसाठी रेव्हेन्यू शेअरिंगदेखील करेल.

आपल्या देशातील टॅलेंटला प्रमोट करणार

कंपनीचे को-फाउंडर आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुमित घोष यांनी आमच्याशी केलेल्या बातचीतदरम्यान म्हटले की, कंटेंट क्रिएटर्ससाठी चिंगारी आधीच एक हॉटस्पॉट म्हणून वर आला आहे. हे पाहता, आम्ही हा प्लॅटफॉर्म म्युजिक कंपोजर्सलाही देत आहोत. 16 मिलियन यूजर्ससोबत चिंगारी चांगल्या म्यूजिक कंपोजर्सना चांगली रीच देईल. आपल्या देशातील टॅलेंटला प्रमोट करण्याचा उद्देश यामागचा आहे. लवकरच आम्ही डांस आणि इतर टॅलेंटद्वारे क्रिएटर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन कमाई करण्याची संधी देऊ.


जुलै अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल

यूजर्समधील वेगाने वाढणारी डिमांड पाहून आम्ही सतत अॅपला अपडेट करत आहोत. अशा परिस्थितीत कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे. सुमित सांगतात की, सध्या कंपनीत 25 कर्मचारी आहेत, पण जुलै अखेरपर्यंत 100 कर्मचारी केले जातील. चिंगारी अॅपला अनेक कंपन्यांकडून फंडिंग आणि इन्वेस्टर्सच्या ऑफर आल्या आहेत.

चिंगारी प्लॅटफार्मनर क्रिएटर्सला प्रक्येक व्ह्यू साठी पैसे मिळतील

चिंगारी यूजर्सला आपल्या व्हिडिओसाठी पॉइंट्स (प्रती व्ह्यू) मिळतात. याला नंतर पैशात रिडीम केले जाते. समाचार फीड फॅशनमध्ये व्हिडिओ अपलोड करणे आणि कंटेंट सर्चशिवाय यूजर्स नवीन लोकांसोबत ओखळ करू शकतात. यासोबतच अॅप ट्रेंडिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, लव कोट्स आणि इतर अनेक गोष्टी देतो.

अॅपमध्ये  आहेत 10 भाषा    

चिंगारी अॅपचा इंटरफेस टिक टॉकसारखा आहे. पण, यात अनेक सुधारणांची गरज आहे. या अॅपमध्ये इंग्रजीशिवाय, हिंदी, बंगला, गुजराती, मराठी, कन्नड़, पंजाबी, मलयालम, तमिळ आणि तेलुगु भाषेचा सपोर्ट आहे. हे अॅफ अँड्रायड आणि आयओएस यूजर्ससाठी मोफत उपलब्ध आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post