ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  करोना महामारीच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्यांचा वापर सायबर भामट्यांनी सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या गैरपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.

१) कोविड १९ – या प्रकारात तुम्हाला एक ई-मेल अथवा मेसेज येतो की तुम्ही जर Amazon Gift Coupon खरेदी केले तर त्याची रक्कम कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी वापरली जाईल. अशा आशयाचा मजकूर व एक लिंक दिलेली असते. ही लिंक Amazon.com सारखी पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते. याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

२) Job Offer Scam: या प्रकारात तुम्हाला एक ई-मेल किंवा मेसेज येतो की तुम्ही सध्याच्या काळात घरबसल्या काम करुन पैसे मिळवू शकता. त्यासाठी एक लिंक दिली जाते. ही लिंक Amazon.com सारखी पण फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

३) ऑनलाईन खरेदी स्कॅम : बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. याचा फायदा घेऊन एखादी फेक वस्तू जसे की मोबाईल, पुस्तके, अन्य गृह उपयोगी वस्तू किंवा अगदी पाळीव प्राणी विकायला आहेत अशी जाहिरात करतात. ही लिंक Amazon.com किंवा अन्य e-portal सारखी दिसायला पण फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

४) Boss Scam: कधी- कधी तुम्हाला तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने एखादा ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुमच्या वरिष्ठांनी तुमच्यासाठी Amazon gift card खरेदी केले आहे, तर सोबतच्या लिंकवर क्लिक करुन ते redeem करा. सदर लिंक Amazon.com सारखी पण फेक लिंक असते.तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

५) टॅक्स स्कॅम : यामध्ये नागरिकांना एक ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुम्ही काही कर भरायचा बाकी आहे व तो तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करुन एका विशिष्ट तारखेपर्यंत भरा अन्यथा तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सदर लिंक ही सरकारी कर भरायच्या लिंक सारखीच दिसते, पण फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते त्याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,

१) जर वरील नमूद प्रकारचे काही ई-मेल किंवा मेसेज किंवा फोन आले तर त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका.

२) सध्याच्या काळात जर कोणी तुम्हाला घर बसल्या पैसे मिळवू शकता असे सांगत असतील तर लगेच विश्वास ठेऊ नका तुम्ही फसविले जाण्याची शक्यता अधिक आहे.

३) ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा. एखादी वस्तू जर कोणी बाजारभावापेक्षा खूप स्वस्त विकत असेल, तर सतर्क व्हा.

४) इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व काही माहिती खरीच असेल असे नाही.

५) जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी गिफ्ट कार्ड कुपन भेट दिली आहे, असा काही ई-मेल किंवा मेसेज आला तर त्याची वरिष्ठांकडून खात्री करून घ्यावी.

जर तुमची वरील नमूद प्रकाराने किंवा अन्य कोणत्याही प्रकारची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवा, तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण माहिती द्यावी.

असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post