केव्हिन पीटरसनचे टिवटर अकाऊंट ब्लॉक !


माय अहमदनगर वेब टीम
लंडन -नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनचे टिवटर अकाऊंट ब्लॉक केले गेले आहे. बिˆटीश पत्रकार पियर्स मॉर्गन यांनी शनिवारी ही माहिती दिली.

’’ब्रेकिंग, मला मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल केव्हिन पीटरसनला टिवटरवरून निलंबित केले गेले. हा एक विनोदी विषय होता. कृपया त्याचे टिवटर अकाऊंट सुरू करा‘, असे मॉर्गनने टिवटरवर म्हटले. मॉर्गन यांनी टिवटबरोबरच एक स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.

याप्रकरणी टिवटर म्हणाले, ‘कृपया हे जाणून घ्या की नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आपले खाते कायमचे निलंबित केले जाऊ शकते. आपल्या खात्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी टिवटर प्रक्रियेचे अनुसरण करा.‘

‘पियर्स मॉर्गन, मी तुला जेव्हा बघेन तेव्हा कानाखाली मारेन. हे मूर्खपणाचे ठरणार नाही‘, असे पीटरसनने म्हटले होते. पीटरसनने २०१४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने इंग्लंडकडून १०४ कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केले. त्यात त्याने ८ हजार १८१ धावा केल्या. तर १३६ एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर ४ हजार ४४० धावा आहेत. ३७ टी-२० सामन्यात त्याने१ हजार १६७ धावा केल्या. पीटरसनने आयपीएलमध्ये ३६ सामने खेळून १ हजार एक धावा केल्या. ज्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post