सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्षपदी पुन्हा भावोजीच!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) आदेश बांदेकर यांची पुढील तीन वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली. आज त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. या संदर्भात  २०१८ मध्ये राज्य सरकारकडून काढण्यात आला होता.

२४ जुलै २०१७ रोजी राज्य सरकारने बांदेकर यांची मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर वर्षभराने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. आता पुन्हा तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post