पुण्यात आजपासून अनलॉक-२माय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुणे व पिंपरीतील दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन आज संपल्यानंतर, जुलैअखेर लॉकडाऊनपूर्वीची स्थिती कायम असणार आहे. थोडक्यात अनलॉक-2 ला सुरुवात होईल. प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व दुकाने पूर्वीप्रमाणे सम-विषम पद्धतीने सुरू राहतील.  खासगी वाहनांना सशर्त परवानगी असेल. सरकारी, खासगी कार्यालये पूर्वीच्या निर्बंधानुसार सुरू होतील.सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असेल. रात्रीच्या संचारबंदीबाबतचे पूर्वीचे निर्बंध कायम राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज स्पष्ट केले.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्ह्याबाबत निर्णय घेणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांची ऑनलाइन पत्रकार परिषद झाली. त्यात वरील माहिती देण्यात आली. या परिषदेला विभागीय आयुक्‍त विशेष कार्य. अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्‍त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पोलिस सहआयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

शनिवार, रविवारबाबत लवकरच निर्णय

सौरभ राव म्हणाले की, लॉकडाऊन संपत असला तरी गर्दी नियंत्रणासाठी विशेषतः शनिवारी, रविवारी प्रतिबंध लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय चर्चा करून व वरिष्ठांना माहिती देऊन घेण्यात येईल. राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 14 जुलैपासून 23 जुलैपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे उद्या शुक्रवार (दि. 24) पासून लॉकडाऊनपूर्वीचे निर्बंध लागू राहतील. दुकाने उघडण्याबाबत सम-विषम दिनांकाचे नियम लागू राहतील.

एकूण 87 कंटेन्मेंट झोन

महापालिका आयुक्‍त विक्रमकुमार यांनी पुणे महापालिका हद्दीसाठीचे निर्बंध, तसेच नवीन कंटेन्मेंट झोनची यादीबाबत सुधारित आदेश गुरुवारी रात्री जाहीर केला. त्यातील बहुतेक आदेश हे पूर्वीचेच आहेत. 87 कंटेन्मेंट झोनची नावे जाहीर केली असून, पूर्वीच्या तुलनेत ती कमी आहेत. लॉकडाऊनपूर्वी शहरात 109 प्रतिबंधित क्षेत्र होते. त्यातील 22 प्रतिबंधित क्षेत्र कमी झाले आहे.

सुरक्षेसाठी :

अत्यावश्यक कारणाशिवाय रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडता येणार नाही.
तसेच 65 वर्षे वयांवरील ज्येष्ठ व 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुले यांनाही आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक.
सार्वनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सामाजिक आंतर पाळणे, मास्क वापरणे बंधनकारक
प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध ः
महापालिकेने नव्याने निश्‍चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात फक्‍त जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा सुरू राहतील. या भागातील किराणा दुकान, दवाखाने, दूधविक्री, रेशन इत्यादी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंतच उघडी राहतील.

हे सुरू...

वैयक्‍तिक व्यायाम, सायकलिंग, जॉगिंग
पालिकेची उद्याने मैदाने, उद्याने पहाटे पाच ते सायंकाळी 7 अखेर खुली
15 टक्के कर्मचारी उपस्थितीसह शासकीय कार्यालये
खासगी कार्यालये जास्तीत जास्त 10 टक्के कर्मचारी उपस्थितीसह
तुळशीबाग, हॉगकाँग लेन, मंडईतील दुकानांना सम-विषम नियमानुसार परवानगी
दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5
टॅक्सी, कॅब, रिक्षासह खासगी चारचाकी वाहनांना परवानगी.
वाहनचालकांसह दोघांना परवानगी
पथारी व्यावसायिक, घरकाम करणार्‍या महिला, सुरक्षा रक्षक, वित्तीय बँका, ई-कॉमर्स, माहिती तंत्रज्ञान, खाद्य पदार्थ, बांधकामे
पलग्न समारंभास 50 व्यक्‍तींची अट प अंत्यसंस्काराला 20 व्यक्‍तींची अट

 हे बंद...

शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण वर्ग
सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, नाट्यगृहे
सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
धार्मिक स्थळे,
मॉल, हॉटेल, उपाहारगृहे बंद. पार्सल सेवा सुरू
प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी, कामगारांना परवानगी नाही


वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था, तसेच डिजिटल, प्रिंट मीडिया यांची कार्यालये शासकीय नियमांनुसार सुरू राहतील. वर्तमानपत्र वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्येच राहील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post