चोरट्यांनी गोदाम फोडून १८ लाखांचे एलसीडी लांबवलेमाय अहमदनगर वेब टीम
नाशिक - द्वारका जवळील तिगराणीया कॉर्नरलगत गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रीब्युटर्सचे गाेदाम फोडून चोरट्यांनी सुमारे १८ लाख रुपयांचे एलसीडी, एसीचे संच पळवून नेले.

मध्यरात्री सुमारे दोन तास चोरीचा हा प्रकार सुरु होता. ताे सीसीटीव्हीत कैद झाला असून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी गुरूवारी गाेदामाच्या शटरचे कुलूप तोडून शटर उघडले. त्यानंतर गुदामाबाहेरच ट्रक उभा केला होता. गुदामातील पॅनासॉनिक व टीसीएल कंपनीचे एलसीडी, एसीचे १३८ संच आणि रोकड चोरट्यांनी चाेरून नेली.

दरम्यान चोरी करत असताना चोरट्यांना गुदामातील सीसीटीव्हीची कल्पना आल्याने त्यांनी त्यावर कपडा टाकला तसेच कनेक्शन तोडून टाकले. सुमारे दोन तास चोरटे गुदामातील साहित्य चोरत होते.

सकाळी गुदाम व्यवस्थापक आला असता हा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळाल्याचे पाेलीस उपायुक्त अमाेल तांबे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post