मुकेश अंबानी ठरले जगातील पाचवे श्रीमंत व्यक्‍ती




माय अहमदनगर वेब टीम
न्यूयॉर्क - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्‍तींच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे मुकेश अंबानी पहिल्या पाच व्यक्‍तींमध्ये समाविष्ट झाले आहेत. ‘फोर्ब्स’ने तयार केलेल्या या यादीत त्यांनी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनाही मागे टाकले आहे. अंबानी यांची संपत्ती आता 75 अब्ज डॉलर्स इतकी झाली असून, बफेट यांची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक व सीईओ जेफ बेजॉस हे असून, त्यांची संपत्ती 185.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. दुसर्‍या स्थानावर ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेटस् हे असून त्यांची संपत्ती 113.1 अब्ज डॉलर्स आहे. ‘एलव्हीएमएच’चे बर्नार्ड अर्नोल्ट व त्यांचे कुटुंबीय 112 अब्ज डॉलर्स संपत्तीसह तिसर्‍या स्थानावर आहेत. चौथ्या स्थानावर ‘फेसबुक’चे सीईओ मार्क झुकेरबर्ग असून, त्यांची संपत्ती 89 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्या महिन्यातच अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली डिजिटल सेवा, जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये सुमारे 33 टक्के हिस्सेदारी फेसबुक आणि गुगलसह अन्य प्रमुख गुंतवणूकदारांना विकल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्‍त झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ‘रिलायन्स’ने एकूण चौदा करारांची घोषणा केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post