विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
पंजाब - पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्तांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. अमरिंदर सिंग यांनी घटनेनंतर ट्विट केलं असून दोषींना सोडणार नाही सांगत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.“विषारी दारु प्यायल्याने झालेल्या संशयित मृत्यूंप्रकरणी मी दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला आहे. जालंधरचे आयुक्त संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील. संबंधित एसएसपी आणि अधिकाऱ्यांशी ते समन्वय साधतील. दोषी आढळतील त्यांना सोडलं जाणार नाही,” असं अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.






मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यास सांगितलं आहे. कारवाईसाठी विभागीय आयुक्तांना त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post