कोरोना काळातही कर्मचाऱ्यांकडून प्रामाणिकता दिसून येते : नगरसेवक गणेश भोसले


मनपा कर्मचाऱ्यांचे नगरसेवक गणेश भोसले यांच्याकडून सत्कार

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध प्रश्नांपासून मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचे काम कर्मचारी करत असतात. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य कर्मचारी कुठल्याही संकटाच्या काळात आपली दिलेली जबाबदारी दररोज सक्षमपणे पार पाडत असतात. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये माणूस माणसापासून भितीपोटी लांब चालला आहे. आपल्या घराजवळ कोरोना संसर्ग आढळला तरी आपण त्या दिशेने जाण्यास घाबरत असतो. शहरामध्ये कोरोना विषाणूचे अनेक मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. अनेक भागात टप्प्याटप्प्याने कंन्टेमेंन्यट झोन व बफर झोन असतानाही महापालिकेचे कर्मचारी त्या भागामध्ये दैनंदिन कामकाजासाठी जात असतात. नागरिकांमध्ये घबराट असतानाही आपला जीव धोक्यात घालून शहरातील स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य तसेच पाणीपुरवठ्याचे काम वेळोवेळी पार पाडत आहेत. मनपा कर्मचाऱ्यांचे मानावे तेवढे आभार कमीच पडतील. ते करत असलेल्या कामाचे कौतूक करुन त्यांना सहकार्य करुन प्रत्येक
नाग
रिकाने आपले कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन नगरसेवक गणेश भोसले यांनी केले.


महापालिकेचे दैनंदिन कामकाज करणारे सर्व विभागातील कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मा. नगरसेवक संजय
चोपडा, विभागप्रमुख नाना गोसावी व कर्मचारी वृंद.

यावेळी बोलताना मनपा विभागप्रमुख गोसावी म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात मनपा कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. केलेल्या कामाचे कौतूक नगरसेवक गणेश भोसले यांनी करून
कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची दखल घेतली. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. जेणे करून ते आपली जबाबदारी अधिक क्षमतेने पार पाडतील, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post