राज्यात 6 हजार 603 नवे करोनाग्रस्त


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात 6 हजार 603 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 198 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 23 हजार 724 वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण 2 लाख 23 हजार 724 करोनाबाधितांमध्ये, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या 1 लाख 23 हजार 192 जणांचा व करोनामुळे मृत्यू झालेल्या 9 हजार 448 जणांचा समावेश आहे. तर आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यात 89 हजार 294 रुग्ण अ‍ॅक्टिव आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

देशात करोनाची स्थिती गंभीर असून महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला आहे. महाराष्ट्रातही करोनाचे सर्वाधिक जास्त रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील करोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.

सामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना देखील, करोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. मागील 48 तासांत 278 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे राज्यात 71 पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या राज्यात 1 हजार 113 पोलीसांवर उपचार सुरू आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post