अमेरिकेत 24 तासांत 60 हजार करोना रुग्णमाय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - जगात करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्णांची भर पडत आहे. अमेरिकेत मागील चोवीस तासांत 60 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे ही आजपर्यंतची सर्वाधिक नोंद असल्याचे मानले जात आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत एकूण 60 हजार 209 नवीन रुग्ण वाढले आहेत. या व्यतिरिक्त 1 हजार 114 मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय मृत्यूसंख्या 1.31 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच, एकूण संक्रमितांची संख्या जवळपास 31 लाखांवर पोहोचली आहे. करोना संसर्गाच्या बाबतीत एका आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे, तर दररोज सरासरी 50 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिकेत घेण्यात येणार्‍या चाचण्यांची संख्या बर्‍यापैकी अधिक आहे. अमेरिका दररोज सुमारे पाच लाख चाचण्या करत आहे. आतापर्यंत 30 कोटींहून अधिक चाचण्या घेण्यात आल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे येथील नागरिक कोणत्याही निर्बंधाशिवाय वावरत असल्याचे दिसून येत आहे.

जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये चाचणी होत असल्या तरी दररोज 1.80 लाखांहून अधिक रुग्ण वाढत आहेत. यात अमेरिका, ब्राझील आणि भारताचा समावेश आहे. तीन देशात एक लाखाहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. जगात एकूण करोनाग्रस्तांची संख्या 1.20 कोटींवर गेली आहे, तर 5.46 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post