राज्यात 24 तासांत कोरोनाचे 224 बळीमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात गेल्या 24 तासांत 5 हजार 134 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून 224 रोवनाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के एवढा आहे. राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 17 हजार 121वर पोहोचली असून मृतांचा आकडा 9 हजार 250 झाला आहे.

तसेच 24 तासांत 3 हजार 295 रुग्ण बरे झाले आहेत . आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 89 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 (18.69 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post