मिग, अपाचे हेलिकाप्टर्सच्या लडाख सीमेवर रात्रभर घिरट्या



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चीनच्या सैनिकांनी लडाखच्या पूर्व सीमेवरून माघार घेण्यास सोमवारी सकाळपासून सुरुवात केली आहे, चीनचे सैनिक खरोखरच ठरलेल्या ठिकाणी परतत आहेत काय, हे तपासण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मिग-29, अपाचे या लढाऊ आणि चिनूक या अवजड मालवाहू हेलिकॉप्टर्सने रात्रभर घिरट्या घातल्या.

या परिसरात रात्रभर वादळी वारे वाहात होते आणि कडाक्याची थंडीही होती. या स्थितीतही भारतीय जवान जमिनीवर आणि हेलिकॉप्टर्स आकाशातून चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते असे मंगळवारी सांगण्यात आले.

रात्रीची ही गस्त सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. जवानांचा जोश प्रचंड असल्याने, त्या बळावर भारतीय हवाई दलाने कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवले आहे. संकटाचा सामना करण्यासाठी या संपूर्ण परिसरात फक्त प्रशिक्षित जवान आणि अधिकार्‍यांनाच तैनात करण्यात आले आहे. जमिनीवरील जवानही युद्धाचा दररोज सराव करीत आहेत.

अपाचे हेलिकॉप्टर्समधील वैमानिकांनी नाईट व्हिजन गॉगल्स लावून चिनी सैनिकांच्या हालचाली टिपत होते. या गॉगल्सच्या माध्यमातून वैमानिक रात्रीच्या गडद अंधारात आणि पर्वतावरील बर्फाच्छदित भागात लपलेल्या हालचालीही सहजपणे पाहू शकतात, हे विशेष.

सोमवारी सायंकाळपासून या भागात वादळी वार्‍यांना सुरुवात झाली होती. या वादळातही हेलिकॉप्टर्सने उड्डाण घेतले. यावेळी जमिनीवरील जवानांनीही त्यांना सॅल्युट ठोकला. रात्री दहाच्या सुमारास वार्‍यांची गती थोडी कमी झाली आणि चिनूक हेलिकॉप्टर आकाशात उडाले. पर्वतीय भागात घिरट्या घालून ते पुन्हा जमिनीवर परतल्यानंतर, मिग-29 आणि सुखोई-30 या विमानांनी रात्री अकराच्या सुमारास उड्डाण घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post