केंद्राचे हॉस्पिटल सर्वांसाठी खुले
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रविवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी सांगितले की, कॅबिनेटने निर्णय घेतला आहे की, दिल्ली सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात कोरोना असेपर्यंत फक्त दिल्लीतील नागरिकांवरच उपचार केले जातील. तर, केंद्र सरकारच्या अंतरर्गत येणाऱ्या रुग्णालये सर्वांसाठी खुला राहतील.
केजरीवाल यावेळी म्हणाले की, त्यांच्या सरकारने मागच्या आठवड्यात दिल्लीकरांकडे मत मागितले. यातील 90 टक्के लोकांचे म्हणने आहे की, कोरोना असेपर्यंत दिल्लीतील रुग्णालयात फक्त दिल्लीकरांवरच उपचार व्हावेत. दिल्ली सरकारने यावर 5 तज्ज्ञांची कमिटी बनवली होती. यात सांगण्यात आले की, जून महिन्यात दिल्लीत 15 हजार बेडची गरज पडू शकते. यानंतर सरकारने हा निर्णय घेतला.
काही खासगी रुग्णालये सर्वांसाठी खुले
केजरीवाल यांनी पुढे सांगितले की, काही खासगी रुग्णालये, जे ऑन्कोलॉजी आणि न्यूरोलॉजीसारख्य़ा खास सर्जरी करतात त्यांना सुरू ठेवण्यास परवानगी असेल. या रुग्णालयात देशातील इतर भागातून येणारे लोक उपचार घेऊ शकतात. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या हॉटेल्स आणि बँक्वेट उघडण्याची परवानगी दिली जात आहे.
10 जूनपासून मद्यावरील 70% लेवी हटवली जाईल
यावेळी सांगण्यात आले की, लॉकडाउनदरम्यान मद्यावर लावलेला 70% अतिरिक्त चार्ज 10 जूनपासून हटवण्यात येत आहे. परंतू, सरकारने मद्यावरील वॅट 20% वरुन 25% केला आहे.
Post a Comment