20 दिवसात 8 दहशतवाद्यांना मारले


माय अहमदनगर वेब टीम
काश्मीर  - दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील रेबेन गावात रविवारी सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी जवानांकडून तीन दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. परिसरात जेव्हा सुरक्षादलाचे सर्च ऑपरेशन सुरू होते, तेव्हा सीआरपीएफ, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या टीमवर दहशतवाद्यांना फायरिंग सुरू केली. यावेळी प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांकडूनही फायरिंग करण्यात आली. दरम्यान, मागी 20 दिवसात सुरक्षा दलाकडून 8 दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे.
मागील काही दिवसात 4 मोठे एनकाउंटर
30 मे, कुलगाम: वानपोरा परिसरात सुरक्षादलाने चकमकित दोन दहशतवाद्यांना मारले. पोलिसांना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारु-गोळा जप्त केला.
19 मे, श्रीनगर: सुरक्षा दलाने डाउनटाउन परिसरात हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांना मारले. यातील एक जुनैद सहराई होता, जो कट्टरतावादी संघटना तहरीक-ए-हुर्रियत प्रमुख मोहम्मद अशरफ सहराईचा मुलगा होता.
16 मे, डोडा: डोडाच्या खोत्रा गावात हिजबुल मुजाहिदीनचा हदशतवादी ताहिरला 5 तासांच्या चकमकित मारण्यात आले.
6 मे, पुलवामा: सुरक्षादलाने हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला मारले. तो दोन वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये सामील होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post