नगर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाची हजेरी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहर व परिसरात गुरुवारी (दि.25) रात्रभर आणि शुक्रवारी (दि.26) पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहर परिसरातून वाहणार्‍या सीना नदीला आणि भिंगार नाल्याला यावर्षी प्रथमच पूर आल्याचे पहावयास मिळाले. तसेच इतर ओढे, नालेही दुथडी भरून वाहताना दिसत होते. शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांमध्ये बहुतांश रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते.

नगर शहरात गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली होती. रात्रभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता. शुक्रवारी पहाटे मात्र अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली सुमारे 1 तासभर मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतरही सकाळी 7 वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता.

या पावसामुळे अनेक भागात ड्रेनेज तुंबल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आले होते. विविध भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांसह नागरिकांचे हाल झाले. रस्त्यावरून वाहणार्‍या पाण्यामध्ये आपली गाडी सांभाळताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post