अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – सिद्धार्थनगर येथील ६, नालेगावच्या वाघ गल्ली येथील ४, तोफखाना येथील १२ जणांसह अहमदनगर  जिल्ह्यात आज २८  नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. यात शहरातील २२ जणांसह कर्जत येथील २ , शिर्डी येथील १ तर जवळा, जामखेड येथील १ व सिव्हिल हडको भागात राहणारे नंदुरबार येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या आता १०५ इतकी झाली आहे.
नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात ६, वाघगल्ली नालेगाव भागात ४,  तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी,नंदुरबार येथील आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सध्या ॲक्टिव रुग्णसंख्या १०५ इतकी झाली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील ५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post