माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अनलॉक-1च्या प्रक्रियेनंतर नगर जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा उद्रेक पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात गुरुवारी 12 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. यात नगर शहरातील चौघांचा समावेश असून, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 36 कोरोना संसर्ग रुग्ण झाले आहेत. त्यात नगर शहरातील 22 जण आहेत. नगर शहरातील नालेगाव येथील वाघ गल्ली मधील 42 वर्षीय महिला, 45 वर्षीय आणि 50 वर्षीय पुरुष तसेच 18 वर्षे युवक कोरोना बाधित आहे. सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. पारनेर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर आणि नगर तालुक्यातील हे रुग्ण आहेत.
सिध्दार्थ नगर आणि तोफखाना परिसर कंटेनमेंट झोन घोषित झाले असून, महानगर पालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी तसे आदेश जारी केले आहेत. कोरोना रुग्ण आढळल्याने शहरातील हे दोन्ही परिसर 10 जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत.
Post a Comment