कंटेन्मेंट झोनमध्ये दुसऱयाच दिवशी पाणीसंकट


माय अहमदनगर वेब टीम
कंटेन्मेंट झोनमध्ये दुसऱयाच दिवशी पाणीसंकट
अहमदनगर – करोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या नगर शहरातील बहुतांश भागावर दुसऱयाच दिवशी पाणी टंचाईचे संकट येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइनला देहरे गावाजवळ गळती लागली आहे. त्यामुळे शुक्रवारी (२६ जून) या भागाला उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
नगर शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजे सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार या भागात नेहमीपेक्षा उशिरा आणि कमी पाणी येणार आहे. गुरूवारी सायंकाळी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे टोलनाक्याजवळ फुटली आहे. दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यात पावसाचाही अडथळा येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post