सौम्य लक्षणं असणार्‍या करोनाबाधितांवर घरीच उपचार




माय अहमदनगर वेब टीम
पुणे – पुणे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात करोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहे. करोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणं असणार्‍या रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली.

पुण्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील करोनाबाधित रुग्णांना घरीच विलग करुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था उभारली जाणार आहे. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर फोनवरुन सल्ला देणार आहे. करोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणं असणार्‍या रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे. ज्या करोनाबाधित रुग्णांचे घर मोठे आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र किचन, बेडरुम, बाथरुम आणि केअर टेकर आहेत, या रुग्णांवरच घरी उपचार करण्यात येतील, अशा अटी पालिकेने ठेवल्या आहेत.

मात्र झोपडपट्ट्या किंवा वस्त्यांवरील रुग्णांना हॉस्पिटलमध्येच उपचार दिले जाणार आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आणि अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पालिका प्रशासनाने हा उपाय सुचवला आहे, असे पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post