गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडलामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – 5 गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदा वाहतुक करणारा पिकअप टेम्पो तोफखाना पोलिसांनी मंगळवारी (दि.16) सायंकाळी 6 च्या सुमारास बोल्हेगाव येथील भारत बेकरीजवळ पकडला.

याबाबतची माहिती अशी की, तोफखाना पोलिस हे त्यांच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका पिकअप टेम्पोमधून 5 गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना आढळुन आले. परंतु पोलिसांना पाहताच इलाहीबक्ष्य उस्मानभाई कुरेशी (रा.पितळे कॉलनी), तरबेज हबीब कुरेशी, अलफेज फारूक कुरेशी, सुफियान इदबीज कुरेशी, उमीद कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट) हे पळुन गेले.

या प्रकरणी पोलिस नाईक शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारणा कायदा 1995 चे कलम 5, 9 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post