कोरोना योद्धांच्या पाठिशी राहिले पाहिजे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जगभरात कोरोना या गंभीर संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. आज संपूर्ण मनुष्याजाती संकटात असतांना पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षणासाठी रात्रं- दिवस झटत आहेत. ते देत असलेले अतुलनीय योगदान कौतुकास्पद आहे. नगरमधील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावत आहेत. या कोरोना योद्धांच्या पाठिशी राहिले पाहिजे. यासाठी आमच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या सॅनिटायझर व हॅण्ड वॉश देत आहोत. या संसर्गाचा कायमचा नायनाट व्हावा, यासाठी या योद्धांनी काम करावे, नागरिकांनीही शासकीय रुग्णांलयाच्यावतीने देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे, असे प्रतिपादन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मणराव पोकळे यांनी केले.
प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने जिल्हा रुग्णातील कोरोना योद्धे डॉक्टर, कर्मचार्यांसाठी सॅनिटायझर व हॅण्ड वॉश जिल्हा रुग्णालयाचे कोविड 19 नोडल अधिकारी बापूसाहेब गाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मणराव पोकळे यांनी सुपूर्द केले. याप्रसंगी राजेंद्र पोकळे, सतीश वराडे, सुरेश गलांडे, संदेश रपारिया आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बापूसाहेब गाडे म्हणाले, या कोरोना रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी चांगल्या पद्धतीने उपचार करत आहेत. परंतु आज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे.
प्रहार दिव्य संघटनेने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्यांसाठी दिलेल्या मदतीमुळे मनोधैर्य वाढण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे, असे सांगितले.
Post a Comment