वजन कमी करण्यासाठी करा या गोष्टी
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - जिरं, धणे आणि बडीशेप पासून तयार केलेले डिटॉक्स ड्रिंक ज्याचे सेवन केल्याने आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत मिळेल.. याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत करतात. त्याच बरोबर आपल्या त्वचेला मऊ, निरोगी आणि तजेल ठेवतात.
जिरं हे पचनाशी निगडित सर्व त्रासांपासून मुक्त करतं. पाचक प्रणाली बळकट करतं. वजन कमी करण्यास उपयोगी आहे.
वजन कमी करण्यास आणि त्वचेला तजेल करण्यास उपयोगी आहे धणे. धणे हे विविध प्रकाराचे खनिजे आणि व्हिटॅमिनचे चांगले स्रोत आहे. जे शरीरातील जास्तीचे वजन कमी करण्यास मदत करतं.
वजन कमी करणे आणि त्वचेवर चमक यावी यासाठी उपयोगी ठरते बडीशेप. उन्हाळ्यामध्ये मुरूम होणे ही त्वचेशी निगडित साधारण समस्या आहे आणि बडीशेप त्वचेला थंड करण्यासाठी ओळखली जाते.
जिरे, धणे आणि बडीशेपेचे पाणी तयार करण्याची कृती –
अर्धा चमचे जिरे, धणे, बडीशेप 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळून घेऊन पाणी गाळून घ्या.काळे मीठ, मध आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये मिसळा. याचे सेवन करा.
Post a Comment