पुरेशा झोपेचे महत्त्व


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - जे लोक कमी झोपतात त्यांची  HDL कोलेस्ट्रोल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. ज्याचा उपयोग बॅड फॅट्स कमी करण्यास होतो आणि हृदयविकार यांसारख्या आजरांना आळा बसतो. कारण असे दिसून आले की, जे लोक कमी झोपतात किंवा रात्रभर जागे असतात त्यांच्यात स्थूलता येते. यावरून पुरेशा झोपेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. किती वेळ झोपणे गरजेचे आहे हे व्यक्तीनुसार बदलते. परंतु, साधारणपणे ७-९ तास झोप प्रौढांसाठी आवश्यक आहे.

भरपेट जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या रात्रीच्या झोपेचे चक्र मात्र बिघडून, परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्ही  निरुत्साही रहाल .

चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता , त्याहून थोडे कमी दुपारचे जेवण व सर्वात कमी रात्रीचे जेवण घेणे हितावह आहे. रात्रीचे जेवण भरपेट व अतिमसालेदार देखील असू नये. यांमुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते . म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच हितावह आहे .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post