गृहनिर्माण सोसायट्यांनी निर्बंध घालू नयेत


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – लॉकडाऊनच्या काळात जनतेने रस्त्यावर न येता चांगला प्रतिसाद दिला. आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या अनावश्यकपणे काही निर्बंध लादत आहेत. तरी गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मुंबई, पुणे तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये वयोवृद्ध लोक राहतात त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी बाहेरील महिला येतात, त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसेच दूध, भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांना आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गृहनिर्माण सोसायटी चेअरमन, संचालक मंडळ अनावश्यक पणे निर्बंध घालत आहे. तरी राज्यातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन ना.पाटील यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post