...म्हणून हे व्यावसायिक उचलणार हे मोठे पाऊल



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात गेली 90 दिवस सलून दुकाने बंद असून, सलून व्यावसायिकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आली असून, सर्वांनी सरकारकडे आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर शहरात सरकार विरोधात तीन दिवस आमरण उपोषण करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात सरकार विरोधात मोठे आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा करुन उपोषण मागे घेण्यास सांगितले व येणार्‍या 16 व 17 रोजी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नाभिक समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन दिले.


यापूर्वीही राष्ट्रीय नाभिक महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच सर्व मंत्री महोदय, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी निवेदने देऊन शासनास सलून व्यवसायिकांच्या प्रश्‍नाची जाणिव करुन दिलेली असून, देखील शासनाने या व्यवसायिकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्षच केलेले आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास 18 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सलून व्यवसायिक जेलभरो आंदोलन करतील असा इशारा जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आला.

याप्रसंगी सुनिल सुनिल वाघमारे, विकास मदने, शहाजी कदम, शरद दळवी, सुनिल खंडागळे, संजय मदने, किशोर मोरे, अनिल निकम, बापू क्षीरसागर, शिवाजी दळवी, दत्ता कदम, आबा सैंदाणे, मनोज शिंदे, नवनाथ राऊत, युवराज राऊत, संतोष ताकपेरे, विनोद साळूंखे, अरुण वाघ, दत्ता कदम व सलून व्यवसायिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post