तोपर्यंत एकही शाळा भरवणार नाही



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर जिल्ह्यात शेवटचा कोरोना रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत नगर तालुक्यातील एकही शाळा भरवणार नाही या बाबतचा ठराव दि.12 रोजी झालेल्या नगर तालुका पंचायत समितीच्या मासीक मिटींगमध्ये घेण्यात आला, अशी माहिती पंचायत समिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही नियम शिथील केलेले आहेत. दरवर्षी जूनच्या पंधरा तारखेपर्यंत सर्व शाळा सुरू केल्या जातात. परंतु या वर्षी कोरोना संसर्गामुळे शाळा उघडण्याची तारीख पंधरा ऑगस्टपर्यंत जाऊ शकते. नगर जिल्ह्यात शेवटचा कोरोना रुग्ण बरा होईपर्यंत शाळा सुरु करू नये. याबाबत पालकांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.


सदय परिस्थितीत सर्व जि.प. शाळा या संशयीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणासाठी दिलेल्या आहेत. शाळेच्या वर्ग खोल्या व स्वच्छता गृह हे अस्वच्छ झाले आहे. या वर्ग खोल्यांमध्ये जर शाळा भरवल्या तर शाळेतील विद्यार्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरणात शाळा सुरु करणे धोकादायक ठरू शकते. पावसाळी वातावरणामध्ये लहान मुलांना सर्दी खोकला व इतर संसर्ग जन्य आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. तसेच लहान मुलांना वैयक्तिक शारीरिक स्वच्छतेची समज कमी असते.

जि.प. शाळा ही इयत्ता 1 ते 7 पर्यत असल्यामुळे हे विद्यार्थी वयाने लहान आहेत. त्यांच्याकडून या रोगाचे निर्देश पाळणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा जास्त संभव आह. त्यामुळे प्रत्येक गावाने ग्रामसभा घेऊन सदर गावामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण किंवा संशयीत नाही असा ठराव घेणे बंधनकारक राहील.

तसेच पंचायत समितीच्या सभागृहाची पुर्व परवानगी घेऊन संबधीत गावामध्ये शाळा भरवली जाईल, असे सभापती कांताबाई कोकाटे यानी सभागृहात सांगितले. याबाबत चर्चा होऊन ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या ठरावाला सूचक म्हणून माजी सभापती रामदास भोर व अनुमोदक उपसभापती रविंद्र भापकर आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post