तीन मजली माडी बांधण्याचा अधिकार द्या
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भिंगार शहरात तीन ते चार मजली माडी बांधण्याचा अधिकार मिळावा आणि कर्मचारी भरतीसह सर्वाधिकार छावणी परिषदेच्या नव्या सुधारित 2020 च्या कायद्यात अहमदनगर छावणी परिषदेच्या सभेला देण्यात यावेत, अशी मागणी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. आर. आर. पिल्ले यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, सदस्यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे ऑनलाईन निवेदन पाठविले आहे. निवेदनाच्या ऑनलाईन प्रती संरक्षण मंत्रालयाचे सचिव, सहसचिव तसेच अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पा. यांना पाठविण्यात आल्या आहेत.
बोर्ड आणि बोर्ड सदस्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्वाधिकार अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डला प्राप्त व्हावे व सुधारित छावणी परिषद कायदा 2020 यात सुधारणा करुन बोर्ड उपाध्यक्ष, बोर्ड सदस्य आणि बोर्ड सभेला हे अधिकार द्यावेत. कारण छावणी परिषदेसाठी 1924 चा ब्रिटिशकालीन कायद्यात सुधारणा 2006 च्या कायदा करण्यात आला. मात्र त्यातही लोकप्रतिनिधी ऐवजी प्रशासनाला (सीईओ) अधिक अधिकार दिल्याने भिंगार शहराचे सातही नगरसेवक अधिकारांपासून वंचित राहिल्याने शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. म्हणून 2020 च्या नव्या सुधारित कायद्यात बदल करुन लोकप्रतिनिधी आणि बोर्ड सभेला अधिक अधिकार मिळावे, अशी अपेक्षा निवेदनात करण्यात आली आहे.
Post a Comment