अहमदनगरसह राहत्यात वाढले कोरोनाचे सहा रुग्ण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील ३४ वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर येथील ४८ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण. याशिवाय, राहाता येथील ४० वर्षीय, ५६ वर्षीय आणि ३२ वर्षीय पुरुष असे तिघे बाधित.
रेल्वे स्टेशन भागातील महिलेला आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने ती दवाखान्यात दाखल झाली होती. केडगाव येथील महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. एमआयडीसी भागातील बाधित व्यक्ती सारीची लक्षणे जाणवल्याने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. त्यानंतर त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
राहाता शहरातील तिघेही बाधित हे यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Post a Comment