जातेगावात माजी सैनिकाची हत्या


माय अहमदनगर वेब टीम
सुपा – पारनेर तालुक्यातील नगर- पुणे महामार्गावरील जातेगाव येथील माजी सौनिकाला वादातुन आपला जीव गमवावा लागला आहे. या जवानाला अक्षरशः दगड, काठ्या, लोखंडी राँडने मारहाण करत रक्ताबंबाळ अवस्थेत आणि डोक्याला खोल जखमा झालेल्या अवस्थेत नगरमधील खाजगी हाँस्पिटलमध्ये दाखल केले होते. गुरुवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याबतची अधिकची माहिती अशी की तालुक्यातील जातेगावात सोयरीकीच्या वादातुन सोमवारी (दि .८) गावातील जिल्हा परीषद शाळेजवळ सायंकाळी ६.३० वाजता लोखंडी राँडने गुड्डू उर्फ सौरभ गणेश पोटघन, विकी उर्फ दिनेश पोटघन व अक्षय बापु पोटघन यांच्या सह अन्य चार पाच जणांनी माजी सौनिक मनोज संपत औटी यांना बेदम मारहाण केली. काहीनी दगडाने तर काहीनी काठी गज आणि लोखंडी राँडने त्यांच्यावर हल्ला चढविला. या मारहाणीत ते जीव वाचविण्यासाठी ओरडत असताना यातील काही आरोपीनी त्यांचे तोंड दाबुन धरले, मारहाण चालू आसताना ते निपचीत पडल्यानंतर आरोपी पळून गेले. दरम्यान मारहाण झाल्याचे समजताच मनोज औटी यांच्या नातेवाईकांनी पारनेरमध्ये रुग्णालयात दाखल केले. त्यांना तेथे ञास होऊ लागल्याने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी सौनिक मनोज औटी यांनी दोन दिवस मृत्यूसी लढत दिली बहुतांशी मार हा डोक्याला लागलेला असल्याने अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. घटनेतील तीनही आरोपी फरार असुन पोलिस त्याच्या शोध घेत आहे. तर, आरोपींना अटक होत नाही तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post