केडगावकरांना धोका! ; जिल्ह्यात वाढले सात रुग्ण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - आज सकाळी आलेल्या अहवालात आणखी नव्याने ७ रुग्णांची भर पडली. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण रोड अहमदनगर येथील 55 वर्षीय महिला, केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलगा यांचा समावेश आहे. तसेच खंडोबा चौक, राहाता येथील १३ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील ३० वर्षीय व्यक्तीसह मुंबईहून संगमनेर येथे आलेली 24 वर्षीय युवतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा १५८ झाला आहे.
Post a Comment