कोरोना धक्का ; अहमदनगरमधील दोन महिलांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या संगमनेर येथील ६३ आणि ६५ वर्षीय महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दोन्ही महिलांना अती उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यापासून व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. संगमनेर शहरातील असलेल्या या महिला दिनांक ६ जून रोजी बाधित आढळून आल्या होत्या.
Post a Comment