रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं


माय अहमदनगर वेब टीम
हेेल्थ डेस्क - रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढते. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.

या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे आपण आपल्या आहारात आंटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल युक्त पदार्थांचा सामावेश करायला हवा.

एका तांब्याच्या टोपात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना स्वच्छ धुऊन घालावा. हे पाणी उकळून समप्रमाणात दिवसातून तीन वेळा घ्यावं.

अक्रोड मध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी आसिडचे प्रमाण जास्त आहे. अक्रोडची पूड घरी बनवून ठेऊन ती रोजच्या जेवणाबरोबर घेतली तरी नक्कीच फायदा होतो.

रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा चूर्ण मधातून घेतल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स पूर्णपणे निघून जातात. आपलं रक्त शुद्ध होतं. उत्साह आणि जोम प्राप्त होतं आणि त्याबरोबरच रोगमुक्ती होते.

दिवसभरात जास्तीत जास्त गरम पाणी पिण्याची सवय करून घेतली पाहिजे. पाण्यात लिंबाचे तुकडे घालून ठेवलेलं पाणी पिण्याने अशक्तपणा कमी होतो. या सर्वांबरोबर योग, पुरेशी झोप आणि आराम करणं हेही तितकंच महत्वाचं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post