राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्या पुढे


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा आकडा वाढत आहे. राज्‍यात मंगळवारी 2,259 नवीन रुग्ण सापडले आहेत. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा आकडा 90 हजार 787 झाला आहे. यातील 44 हजार 849 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.मंगळवारी राज्यात 120 रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्‍यात आतापर्यंत व्हायरसमुळे 3,289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्‍ट्राची राजधानी मुंबईमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे.शहरात सध्या 51 हजारांच्या आसपास रुग्ण आहेत. तसेच, आतापर्यंत 1760 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post