अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत 86 लाखांचा गैरव्यवहार


जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार; चौकशी करून कारवाईची केली मागणी

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत संचालक मंडळाने संगनमताने सुमारे 86 लाखांचा गैरव्यवहार केला असून याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शिक्षक नेते रा.या.औटी, संजय धामणे, नितीन काकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हंटले आहे की, बँकेच्या स्थापनेला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त शताब्दी महोत्सवाच्या नावाखाली एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद संचालक मंडळाने केली, सभासदांना भेटवस्तू किंवा रोख रक्कम देण्यासाठी ही तरतूद वापरण्याऐवजी संचालकांनी स्वतःच्या फायदा करण्यासाठी या निधीचा गैरवापर केला आहे, शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांना रजेचा पगार देण्याची तरतूद केली, परंतु सदर रक्कम प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना न देता त्या रकमेतील पन्नास टक्के रक्कम कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून संचालकांनी काढून घेतली, ही रक्कम अंदाजे 51 लाख रुपये आहे, सध्या कर्मचारी प्रचंड दबावाखाली आहे, सदरची माहिती कर्मचार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

शताब्दी महोत्सवाच्या नावाखाली सभासदांना रोख स्वरूपात रक्कम भेट देणे अपेक्षित असताना संचालकांनी मात्र घड्याळ भेट देण्याचे ठरवले बँकेने विकत आणलेले घड्याळ चारशे रुपये किमतीची असताना 800 रुपयांना विकत घेतली प्रत्येक घरामागे रुपये चारशे प्रमाणे सुमारे 35 लाख रूपयांचा आर्थिक भ्रष्टाचार या संचालक मंडळाने केला आहे शिक्षक बँकेचे झालेल्या 86 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून या संचालक मंडळावर योग्य ती कारवाई करावी. या संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे शिक्षकांच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण झाला आहे.

या विषयात लक्ष घालून हे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली. निवेदनावर रा.या.औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सिताराम सावंत, संतोष भोपे, रघुनाथ लबडे, संभाजी औटी, विजय काकडे, श्री.बनसोडे, बाळासाहेब गोल्हार, अशोक कानडे, बापू लहामटे, सुखदेव मोहिते, मिलिंद पोटे, जालिंदर खाकाळ, प्रल्हाद साळुंके, माणिक जगताप, अनिल अष्टेकर, संतोष डमाळे, विठ्ठल वराळे, राजेंद्र पटेकर, राजेंद्र मरभळ आदींच्या सह्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post