देशात उष्णतेची लाट; राज्यांना रेड अलर्ट जारी


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – देशात उष्णतेची लाट पसरली असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काही जागांवर तापमान 47 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि तेलंगणासह अनेक राज्यांतील तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर गेला आहे. तर राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि चंदीगड या राज्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या काळात दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून नागरिकांना देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी मध्य तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण होवू शकतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post