द्विवेदी, मिटके, मायकलवार, फिरोदिया, बागुल, वधवा यांना ‘चेंज मेकर्स’ पुरस्कार जाहीर


लॉकडाऊन कालावधीत नगर साठी दिलेल्या योगदानाचा होणार गौरव

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- गेल्या दहा वर्षापासून नगर शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून नगर शहराविषयी तळमळ व आस्था वाढवणाऱ्या नगर जल्लोष परिवार ट्रस्टच्या वतीने दिले जाणारे "चेंज मेकर्स’ पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आले आहेत. कोरनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कार्य, समाजसेवा व मदत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान नगर शहराच्या 530 व्या स्थापनादिनी, २८ मे रोजी केला जाणार आहे. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, नगर मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया, राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक डॉ.अमोल बागुल, घर घर लंगरचे प्रणेते हरजीतसिंह वधवा आदीं नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्यावतीने यंदाचे ‘चेंज मेकर्स’ अवॉर्ड 2020 प्रदान केले जाणार आहेत. मानपत्र, वृक्ष, ग्रंथ सॅनीटायझर व मास्क असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराचे अध्यक्ष सागर बोगा यांनी दिली आहे.

पुरस्कारा बद्दल माहिती देतांना रत्नाकर श्रीपत यांनी सांगितले कि, कोरोना लॉकडाऊन मध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या सतत प्रयत्नाने नगर जिल्ह्याच्या चारही बाजूने रेडझोन असतांनाही जिल्ह्यामध्ये योग्य नियोजनाने सर्व उपाय योजना, लॉकडाऊनचे सर्व आदेशांचे अंमलबजावणी केल्याने नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये शहरात कायदा सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठी चांगले प्रयत्न करून लॉकडाऊन यशस्वी केले आहे. स्वतःच्या बंधूचे दुःखद निधन झाले असतांना दुःख बाजूला सारून नगर शहरात मनपाच्या माध्यमातून सर्व सुविधा नागरिकांना देण्यात बहुमोल योगदान देणारे मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कमी कालावधीत उत्कृष्ट काम केले आहे. आय लव्ह नगरच्या माध्यमातून नरेंद्र फिरोदिया यांनी हजारो गरजू कुटुंबांना किराणामालाच्या कीटची मदत देऊन कोरोना प्रतिबंध जनजागृतीसाठी विशेष काम केले. कलाकार शिक्षक अमोल बागुल यांनी लॉकडाऊन मध्ये नगर तहसील फ्लाईंग स्कॉड, स्टडी फ्रॉम होम पॅटर्न, राष्ट्राचे शिल्पकार, पोलिसांना रात्रीचे पाणी वाटप, मास्क बनवून मोफत वितरण आदी उपक्रमाच्या माध्यमातून आपले योगदान दिले. घरघर लंगर सेवेच्या माध्यमातून हारजीत वधवा

यांनी अनेक व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून सुमारे तीन लाखापेक्षा जास्त गरजू पर्यंत मोफत भोजन सेवा व किराणा किट पोहचवले. या सर्वांनी आपले कर्तव्य उत्कृष्ट बजावत सहकार्य केलेल्या लॉकडाऊन काळात सर्वाना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत.

लॉकडाऊन सुरु असल्याने प्रशासनाचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग, सॅनीटायझरचा वापर करून कोणताही कार्यक्रम न करता नगर जल्लोषचा फक्त एकाच कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रत्येक पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे, असे अजय म्याना यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वीते साठी संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लोहार,महेश बल्ला, निलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, सुमित ईप्पलपेल्ली, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप आदी परिश्रम घेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post