प्रधानमंत्री जनधन योजनेची रक्‍कम काढण्‍यासाठीचे वेळापत्रक जाहीर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्‍या सर्व महिला खातेदारांच्‍या बँक खात्‍यावर तीन महिन्‍याकरिता प्रतिमाह 500 रुपये प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजने अंतर्गत सर्व संबधीत बॅक खात्‍यामध्‍ये वर्ग करण्‍यात येणार आहे. सध्‍या सुरु असलेल्‍या कोविड 19 साथीमुळे बँक शाखामध्‍ये आणि ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये म्‍हणून वित्‍त मंत्रालयाच्‍या वित्‍तीय सेवा विभागाने वेळापत्रक जाहिर केले आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनेची माहे मे 2020 या महिन्‍याची रक्‍कम बँक खात्‍यावर जमा करण्‍यात आलेली आहे. महिला लाभार्थ्‍यांची बॅकेत एकाचवेळी गर्दी करु नये म्‍हणून दि.4 मे 2020 रोजी ज्‍या खातेदाराचे बॅक खाते क्रमांकाचा शेवटचा अंक 0 किंवा 1, दि. 5 मे रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक 2 किंवा 3, दि. 6 मे रोजी खाते क्रमांकाचाशेवटचा अंक 4 किंवा 5, दि.8 मे रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक 6 किंवा 7 व दि. 11 मे रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक क्रमांक 8 किंवा 9 आहे. महिला खातेदारांनी दिलेल्‍या वेळापत्रकानुसार बॅकेतून पैसे काढण्‍यासाठी यावेत. अफवांना बळी पडू नका. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी खातेदारांनी एकाच दिवशी बॅकेत पैसे काढण्‍यासाठी गर्दी न करता बॅक मित्र किंवा एटीएमचा वापर करावा असे आवाहन अग्रणी जिल्‍हा प्रबंधक संदीप वालावलकर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post