मुद्रांक दुय्यम निबंधक कार्यालये 6 मे पासून सुरु


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये बँक व बॅकेतर वित्‍तीय संस्‍थांच्‍या वित्‍तपुरवठा कामकाजाकरिता मुद्रांक विकेत्‍यांकडून मुद्रांक पेपर फ्रॅकिंग , बॅकाकडून ईएसबीटीआर घेणे शक्‍य झालेले नाही. लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये निष्‍पादीत करण्‍यात आलेल्‍या दस्‍तांचे मुद्रांक शुल्‍क विहित मुदतीमध्‍ये भरणे शक्‍य झाले नाही अशा दस्‍ताचे मुद्रांक शुल्‍क भरण्‍यासाठी महाराष्‍ट्र अधिनियम 1958 चे कलम 17 नुसार दिनांक 6 मे 20230 रोजी मुद्रांक शुल्‍क भरणा करता येईल असे सह. जिल्‍हा निबंधक तथा मुद्रांक जिल्‍हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

तसेच नोंदणी अधिनियमांचे कलम 89 ब नुसार हक्‍कलेख निक्षेप पध्‍दतीच्‍या गहाण व्‍यवहारात जर करारनामा करण्‍यात आलेला नसेल तर कर्ज घेणा-याने कर्ज व्‍यवहाराची माहिती देणारी सूचना कर्ज व्‍यवहाराच्‍या दिनांकापासून 30 दिवसाच्‍या आत दुय्यम निबंधक कार्यालयामध्‍ये फाईल करणे बंधनकारक आहे. मात्र दि. 23 मार्च 2020 पासुन दि. 3 मे 2020 या कालावधीत लॉकडाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालये बंद असल्‍याने फाईल करणे शक्‍य झालेले नाही. जिल्‍हयातील दुय्यम निबंधक कार्यालये दिनांक 6 मे 2020 पासून सुरु होत असल्‍याने सदर कालाधीत निष्‍पादीत केलेले व योग्‍य मुद्रांकित केलेले दस्‍तऐवज उक्‍त रोजी ई फाईलींगसाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्‍ये सादर करण्‍यात यावेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post