तळीरामांना खुशखबर ! दारू दुकाने उघडण्यास परवानगी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु असल्याने बंद असलेली दारूची दुकाने सुरु करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर नगर शहर व जिल्ह्यातील दारूची दुकाने मंगळवार (दि.५) पासून उघडणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगरचे अधीक्षक पराग नवलकर यांनी सोमवारी (दि.४) सायंकाळी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

दारूची दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. त्यासाठी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे.

जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. आता केंद्र व राज्य शासनाने यात केलेल्या दुरुस्ती नुसार आणि विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यात समान कार्यपध्दती अवलंबविण्यात यावी असे विचाराधीन होते, म्हणूनकेंद्रशासन व महाराष्ट्र शासन तसेच मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी संदर्भ क्र. (१), (२), (३) व (४) मधील आदेशांमध्ये मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. तरी केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या उक्त नमुद संदर्भीय आदेशांतील निर्देशांनुसार अहमदनगर जिल्हयातील अबकारी अनुज्ञप्त्या खालील अटींचे अधिन राहुन चालू करुन देण्याची परवानगी देण्यात येत आहे.

(अ) मद्य निर्माण्याबाबत : (नमुना पीएलएल, सीएल-१ व बीआरएल (मायक्रोब्रुव्हरी वगळता) अनुज्ञप्ती

१) अहमदनगरजिल्हयाच्या ग्रामीण भागातील सर्व मद्य निर्माण्या चालू होतील.

२) अहमदनगर जिल्हयाच्या शहरी भागातील औद्योगीक वसाहती व औद्योगीक टाऊनशिपमधील मद्य निर्माण्या नियंत्रित प्रवेश असल्यास चालू होतील.

३) भारत सरकार, गह मंत्रालय आदेश क्रमांक ४०-३/२०२० डीएम-१(अ) दिनांक १५ एप्रिल २०२० सोबतच्यापरिशिष्ट-II मधील SOP ही या मद्य निर्माण्यांना लागू राहतील.

४) संबधित निर्माणीतील सर्व कागारांची थर्मल स्कॅनिग करावी व ज्या कामगारास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत त्यास निर्माणीमध्ये प्रवेश देऊ नये. ५) मद्य निर्माण्यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे कसोशीने पालन करण्यात यावे.

(ब) मद्याचे घाऊक / ठोक विक्रेत्यांबाबत : [अनुज्ञप्ती नमुना एफएल-१, सीएल-२, व एफएल/डब्ल्यु-१]

१) अहमदनगर जिल्हयाच्या ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार चालू करण्यात येतील.

२) अहमदनगर जिल्हयाच्या शहरी भागातील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार चालु करण्यात येतील. तथापि, सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर व्यवहार सुरु ठेवता येणार नाहीत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post