व्यापारी व ग्राहकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे - आ. संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना संसर्ग हे जगावरील मोठे संकट आहे. आरोग्याचा प्रश्‍न निर्माण नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गेली दोन महिने बाजारपेठ बंद होती. व्यापार, उद्योग ठप्प असल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. आता बाजारपेठ सुरू झाली आहे. व्यापारी व ग्राहकांनी शासनाने सांगितलेल्या सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्‍तांकडे मागणी केल्यानंतर गेली दोन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ आज सकाळी उघडण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी कापडबाजार, शहाजी रस्ता व नवीपेठेची पाहणी केली. या प्रसंगी आमदार जगताप बोलत होते. नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, कोहिनूरचे संचालक प्रदीप गांधी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे आदी उपस्थित होते. 

आमदार जगताप म्हणाले, कापडबाजार ही नगर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतील दुकानांत काम करणारे कामगारांचे हातावर पोट आहे. लॉकडाउनमध्ये कामबंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या संदर्भात 15 ते 20 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला. अटी व शर्तीचे पालन करू असा विश्‍वास दिल्याने महापालिका आयुक्‍तांनी टप्प्याटप्प्याने बाजारपेठेतील सर्व दुकाने खुली करण्याचा निर्णय घेला. बाजारपेठ खुली झाल्याने व्यापारी व कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

जय हिंद प्रतिष्ठान व कापडबाजार व्यापारी असोसिएशन यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post