महापौरांकडून शहर व उपनगरातील नाले साफ सफाई कामाची पाहणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महानगरपालिकेच्‍या वतीने शहर व उपनगरातील मोठे ओढे ,नाले साफ सफाईचे काम सुरू करण्‍यात आले आहे; सदरची कामे पावसाळयापूर्वी होण्‍याच्‍या दृष्टिने मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सर्जेपूरा लालटाकी, तसेच गुलमोहर रोड येथे सुरू आलेल्‍या नाले सफाईच्‍या कामाची पाहाणी केली.

यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, मागच्‍या वर्षी मोठया स्‍वरूपात पाऊस पडल्‍यामुळे ब-याच भागात पाणी साचले होते. या वर्षी सदरचे नाले पावसाळा सुरू होण्‍यापूर्वीच साफ सफाई करून घेण्‍याबाबत आदेश देण्‍यात आले होते त्‍यानुसार नाले सफाईचे काम सुरू करण्‍यात आले. यावेळी शहर अभियंता यांना नाले सफाई करताना निघालेला गाळ त्‍वरीत उचलणे बाबत कार्यवाही करण्‍याच्‍या आदेश दिले . पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी शहरातील सर्व मोठे व छोटे नाले साफ सफाई होण्‍याच्‍या दृष्टिने कार्यवाही करण्‍याच्‍या आदेश दिले. तसेच शहर व उपनगरामध्‍ये ज्‍या भागात पाणी साचते त्‍या ठिकाणचे पाणी निचरा होण्‍याच्‍या दृष्टिने संबंधीत स्‍वच्‍छता निरिक्षक यांनी नियोजन करून कारवाई करण्‍याचे आदेश दिले. तसेच प्रभाग अधिकारी यांनी देखील मागील वर्षी ज्‍या ठिकाणी पाणी साचले होते त्‍या ठिकाणी पाणी साचणार नाही या दृष्टिने उपाय योजना कराव्‍यात व आपल्‍या अधिपत्‍याखालील कर्मचा-यांना सतर्क राहण्‍याबाबत आदेश दिले.

नाले साफ सफाईच्‍या कामाची पहाणी कराताना मा.महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांचे समवेत शहर अभियंता श्री.सुरेश इथापे, माजी नगरसेवक श्री. तायगा शिंदे, श्री पुष्‍कर कुलकर्णी , श्री शिवा आढाव आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post