696 ट्रेनने 10 लाख प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले,


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रातून आतापर्यंत 696 ट्रेन्समधून 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. तर, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए) वरुन मागील 3 दिवसात 14 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. यादरम्यान, कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरात मोठ्या प्रमाणावर स्पेशल मास स्क्रीनिंग सुरू केली आहे. या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आणि चाळी आहेत. या परिसरातून मागील काही दिवसांत अनेक संक्रमित सापडले आहेत.
सर्वात जास्त 374 ट्रेन्स यूपीला पाठवण्यात आल्या
लॉकडाउनदरम्यान महाराष्ट्रातून आतापर्यंत 696 श्रमिक विशेष ट्रेन्समधून 9.82 लाख मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. यात उत्तर प्रदेशासाठी सर्वात जास्त 374 ट्रेन्स पाठवण्यात आल्या, तर बिहारसाठी 169, मध्यप्रदेशसाठी 33, झारखंडसाठी 30, कर्नाटकसाठी 6 आणि ओडिशासाठी 13 ,राजस्थान 15, पश्चिम बंगाल 33 आणि छत्तीसगडसाठी 6 ट्रेन्स चालवण्यात आल्या.
बुधवारी 25 फ्लाइट आल्या आणि गेल्या

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए)वरुन मागील 3 दिवसात 14 हजार 69 प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईच्या एअरपोर्टची जबाबदारी सांभाळणाऱ्या जीवीके मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (एमआईएएल)नुसार, बुधवारी 25 फ्लाइट आल्या. तर, इतक्याच 25 फ्लाइटने उड्डाण घेतल्या.
आतापर्यंत सर्वात जास्त 1,097 मृत्यू मुंबईत
महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,190 नवीन रुग्ण सापडले, तर 964 रुग्ण ठीक झाले. तसेच, काल सर्वात जास्त 105 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 56 हजार 948 झाली आहे. यापैकी 17 हजार 918 ठीक झाले असून, 1,897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त 1,097 मृत्यू एकट्या मुंबईत झाले.
बुधवारी किती आणि कुठे मृत्यू झाले

बुधवारी मुंबईत सर्वात जास्त 32 मृत्यू झाले. तसेच, ठाणे 16, जळगाव 10, पुणे 9, नवी मुंबई आणि रायगड 7-7, अकोला 6, औरंगाबाद 4, नाशिक आणि सोलापूर 3-3, सातारा 2 , अहमदनगर, नागपूर, नंदूरबार, पनवेल आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी 1-1 रुग्णांचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post